सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 विश्लेषण

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर पसरणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

डिजिटल पुणे    11-12-2025 14:51:21

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदनात सांगितले.महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे यूनेस्कोचे मानांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच मूर्त स्वरूपाचा असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे. या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे. निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात. यामुळे भारतीय सण, परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे.आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे नमूद करीत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सभागृहाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.


 Give Feedback



 जाहिराती