सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 जिल्हा

मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, एक जण गंभीर जखमी

डिजिटल पुणे    16-12-2025 12:36:55

मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर सोमवारी (15 डिसेंबर) खळबळजनक घटना घडली. प्रकाश सावंत (वय अंदाजे 50) यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला.घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने धाव घेत कोट तसेच पाणी मारून आग विझवली. गंभीर जखमी अवस्थेत प्रकाश सावंत यांना तातडीने मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60 टक्के भाजल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिक वादातून टोकाचे पाऊल?

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात प्रकाश सावंत यांनी एका वकिलाला एकूण 6 लाख 80 हजार रुपये दिले होते. यापैकी 6 लाख रुपये वकिलाने परत केले असून उर्वरित 80 हजार रुपये देण्यास वकिलाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. या आर्थिक वादातूनच सावंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती