सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 जिल्हा

उरणमध्ये डिझेल व ऑईलची तस्करी जोरात; कारवाईची मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    16-12-2025 18:02:01

उरण : उरण तालुक्यातील मोरा समुद्रकिनाऱ्यावर डिझेल व तत्समतेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे,  उरण परिसरातील समुद्र किनारी डिझेल व तत्सम तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे.मात्र शासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही खुलेआम पणे किनाऱ्यावर हा व्यवसाय करणाऱ्या ऑईल माफियांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. जेएनपीटी बंदरात येणार्‍या परदेशी जहाजातील कर्मचार्‍यांशी संधान बांधून समुद्रकिनार्‍यापासून दूर काही नॉटिकल मैल अंतरावर उभ्या राहणार्‍या जहाजातील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून उरण परिसरात जोरात सुरु आहे.\

सागरी पोलीसठाणे तसेच तटरक्षक दल यांना या तस्करीची माहिती असून, त्यांच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे. परदेशी जहाजातून जवळपास ३० रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत जादा दराने विक्री करून महसूल बुडवण्याचे काम हे तस्कर करतात, असे म्हटले जाते.सध्या डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, काळ्या बाजारातून गाडी व्यावसायिक डिझेल घेताना दिसत आहेत. सागरी पोलीस ठाण्यांचे सागरी मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे.

कारण सर्रास  खाडीच्या परिसरात डिझेलची तस्करी मोठया प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही दिवसांत  याचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. हे समुद्र चाचे बाहेरून येणार्‍या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लिटर डिझेलकमी भावात विकत घेतात.आणि हे डिझेल साठवून ठेवतात. डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढहोत असल्याने डीजेल तस्करांकडून कमी किंमतीत मिळणाऱ्या या डीजेल तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उरण, पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्टचा धंदा करणरे या समुद्र चाच्यांशी संपर्क करून, डिझेल खरेदी करत असतात.डिझेलच्या किंमती वाढल्याने समुद्र चाच्यांचा डिझेल तस्करीचा धंदा जोरात सुरु आहे. परंतु, वेळीच समुद्र चाच्यांवर बंधने घातली नाहीत, तर या मार्गाचा वापर अतिरेकी कारवाई करण्यासाठी भविष्यात झाल्यास नवल वाटू नये. पोलीस खात्याचे  या बाबीकडे दुर्लक्ष आहे. असेच म्हणावे लागेल.

पोलीस खात्याला समुद्र २६/११ च्या हल्ल्याचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. २६/११ च्या हल्ल्यासाठी उरण, (करंजा) जेट्टीचाव खाडीचा वापर केल्याचे त्यावेळी उघड झाले होते. तरी या माफियांवर ठोस कारवाई करण्याची मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे.उरण तालुक्यांतील मोराजेट्टी व जवळपास जेएनपीए बंदर आहे.उरण तालुका हे एक बेट असून सभोताली खाडी पसरलेली आहे.याचा फायदा किनाऱ्यावर डीझेल व तत्सम तेलाची तस्करी करणारे तस्कर घेत असून खुलेआम डीझेल तस्करांनी उरण-मोरा परिसरात धुमाकूळ घातला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती