सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : अजित पवार मुंबईत महायुतीतून बाहेर पडणार? आजच अंतिम निर्णयाची शक्यता

डिजिटल पुणे    17-12-2025 14:43:50

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीसोबत जायचे की स्वबळावर लढायचे, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तणाव उघडपणे समोर आला आहे.नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीत काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे, मात्र पुण्यासंदर्भात आम्ही अजित पवारांच्या पक्षाविरुद्ध लढू, अशी थेट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, मुंबईतील निवडणुकीत नवाब मलिक हे भाजपसोबत नको अशी भूमिका मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीनेही मुंबईत स्वबळाची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना आजच निर्णय होईल, असे सांगितले.  

नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पुण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका मांडत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीत नेमकी काय रणनीती असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत नवाब मलिक यांच्यासोबत भाजपने युती करू नये, अशी स्पष्ट भूमिका मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबईतील पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांसोबत आज चर्चा होणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुका लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची तयारी असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. या दोन्ही महापालिकांमध्ये स्वतंत्रपणे किंवा वेगळ्या समीकरणातून निवडणूक लढवण्याची भूमिका अजित पवार गटाने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

कोकाटेंबाबत निर्णय नंतर – अजित पवार

दरम्यान, माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात न्यायालयात पुढे काय होते, ते पाहिल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

नवाब मलिक आमचे ज्येष्ठ नेते – प्रफुल्ल पटेल

नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची मुलगी एनसीपीची आमदार आहे. पक्षाकडून कोणाशी चर्चा करायची, हे आम्ही ठरवू. तसेच महायुतीत चांगली माणसे येत असतील, तर त्यांचे स्वागत केले जाईल, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संबंध निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती