सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

‘अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही’ फडणवीसांच्या वक्तव्यानंतर 24 तासांतच पिंपरीत भाजप-शिंदे गटाला धक्का

डिजिटल पुणे    17-12-2025 16:20:43

पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल, कटुता निर्माण होणार नाही, असं स्पष्ट केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटक पक्षांना मोठा धक्का दिला आहे. शहरातील भाजपचे तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक असे चार माजी नगरसेवक अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील महायुतीत अंतर्गत राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. याचवेळी, अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी 7 ते 8 इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.

महायुतीत ‘अंतर्गत फोडाफोडी टाळायची’ असा समज असतानाही प्रत्यक्षात अजित पवारांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोडव्याची भूमिका मांडली असली, तरी महायुतीत हा गोडवा टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजप व शिंदे शिवसेनेतील असुरक्षित इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे कटुता निर्माण होणार नाही, असा दावा बहल यांनी केला आहे.

सांगलीतही हालचाली वेगात

दरम्यान, सांगली-मिरज-कुपवाड परिसरातही अजित पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे. माजी महापौरांसह 15 हून अधिक माजी नगरसेवकांनी सोमवारी (ता. 15) रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असून लवकरच मिरजेत अजित पवारांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.भेटीसाठी गेलेले माजी नगरसेवक भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)शी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे माजी महापौर आणि दिग्गज नगरसेवकांचा समावेश आहे. या घडामोडींमुळे सांगलीत खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपलाही धक्का बसल्याचं मानलं जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती