सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

पिंपरी चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण, स्थानिक भाजपच्या नेत्यांचा मात्र विरोध

अजिंक्य स्वामी    18-12-2025 14:02:30

पिंपरी-चिंचवड : नुकत्याच येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नुकतीच घेतलेली भेट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या भेटीनंतर राहुल कलाटे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपकडून महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या गोटात घेण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. राहुल कलाटे यांच्यासारखा प्रभावी विरोधी नेता भाजपमध्ये आल्यास निवडणूक अधिक सोपी होऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र या सर्व चर्चांवर राहुल कलाटे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पिंपरी चिंचवड भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांचा विरोध

दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशाला पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “ज्यांनी आतापर्यंत भाजपचा कट्टर विरोध केला आहे, अशा नेत्यांना पक्षात संधी देऊ नये,” असे म्हटले आहे. भाजपमध्ये आधीच सक्षम आणि अनुभवी उमेदवारांची कमतरता नसताना आयाराम-गयाराम राजकारणाला प्रोत्साहन देणे योग्य ठरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

वाकडकर यांनी ही नाराजी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर शेठ जगताप यांच्याकडेही मांडल्याचे समजते. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही बाहेरील नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एकीकडे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील रणनीती, तर दुसरीकडे स्थानिक नेत्यांचा उघड विरोध, अशा स्थितीत राहुल कलाटे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात त्यांच्या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती