सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं
  • आशिष शेलारांना भाजपमध्ये वाईट वागणूक मिळते, त्यांना काउंसलिंगची गरज; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
 शहर

नितीश कुमार यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी;नितीश कुमार यांचा कोंढव्यात निषेध

डिजिटल पुणे    18-12-2025 14:08:26

पुणे : बिहार राज्यात दिनांक १५ डिसेंबर रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान नोकरीचे नियुक्तीपत्र देताना एका मुस्लिम महिला डॉक्टरचा नकाब किंवा हिजाब हटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केल्याची कथित घटना समोर आल्यानंतर आज १८ रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी न्यायप्रिय नागरिक, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि 'ए एस के ग्रुप लोक दरबार 'सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार  नागरिक जमले. बिहारच्या या घटनेच्या  देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेला महिला सन्मान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकारांवर आघात मानत कोंढव्यात न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.

या वेळी ५० हून अधिक महिला उपस्थित होत्या. इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे अध्यक्ष असलम इसाक बागवान, राजू सय्यद, अलमास शेख, रज्जाक शेख, ए एस के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अहमद समद खान, सौ.मुबीना अहमद खान, अतिक खान, आरिफ खान, मिनाज सय्यद यांच्यासह अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायप्रिय नागरिक, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि ए एस के ग्रुप लोक दरबार सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडले. यावेळी महिला सन्मान आणि संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी आवाज उठवण्यात आला.

महिला सन्मान, संविधानिक मूल्ये आणि न्यायाच्या समर्थनार्थ दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संजय निषाद यांच्याविरोधात योग्य कायदेशीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती घाडगे तसेच गुन्हे निरीक्षक जगताप यांनी आज एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करू,अशी माहिती दिली.


 Give Feedback



 जाहिराती