सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं
  • आशिष शेलारांना भाजपमध्ये वाईट वागणूक मिळते, त्यांना काउंसलिंगची गरज; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
 शहर

संजय आल्हाट यांची लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या ;एससी एसटी विभाग प्रदेशाध्यक्षपदी निवड

डिजिटल पुणे    18-12-2025 15:16:10

पुणे : लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या एससी एसटी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संजय आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान, केंद्रीय कॅबिनेट अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम एम. हवा यांच्या नेतृत्वाखाली संजय आल्हाट यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

आल्हाट हे पक्षाच्या पुणे शहर-जिल्हाध्यक्ष पदी दीर्घ काळ कार्यरत असून यापूर्वी रिपब्लिकन पक्षात प्रदीर्घ काळ काम केले आहे. सामाजिक न्याय, दलित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना संजय आल्हाट यांनी सांगितले की, पद्मभूषण स्व.. रामविलास पासवान  यांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी आपल्याला मिळाली असून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या विश्वासासाठी त्यांनी ज्ञानचंद गौतम( राष्ट्रीय अध्यक्ष, एससी एसटी विभाग), शमीम हवा(राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी), विनयकुमार गायकवाड(कार्याध्यक्ष,) तसेच विजय काका गायकवाड(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) यांचे विशेष आभार मानले.

पुढील काळात महाराष्ट्रात लवकरच राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असून प्रदेश दौरा देखील केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि पदाधिकारी सहकार्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.तसेच मार्च महिन्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत परिचय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांचे पाठबळ आणि आशीर्वाद असेच कायम राहावेत, अशी अपेक्षा संजय आल्हाट यांनी यावेळी व्यक्त केली.

 


 Give Feedback



 जाहिराती