सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं
  • आशिष शेलारांना भाजपमध्ये वाईट वागणूक मिळते, त्यांना काउंसलिंगची गरज; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
 शहर

हिंदू महासभेची पुणे महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर; पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती

डिजिटल पुणे    18-12-2025 15:56:28

पुणे : अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली आठ जणांची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरत असून हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित विकासात्मक राजकारण हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.व्यावसायिक,पत्रकार,गृहिणी,सामाजिक कार्यकर्त्यांचा यादीत समावेश आहे. 

पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवार यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे. विवेक परदेशी (प्रभाग २३ ड),प्रशांत भालेराव (प्रभाग २४ ड),सूर्यकांत कुंभार  (प्रभाग २५ ब),तृप्ती तारे (प्रभाग २५ क),अजित जोशी (प्रभाग २५ ड),नितीन शुक्ल (प्रभाग ३४ ड),विद्या घटवाई  (प्रभाग ३५ ब), राजेंद्र देशपांडे (प्रभाग ३७) हे उमेदवार निवडणूक लढणार असून पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

'मतदारांची आम्ही किंमत नाही करणार,आम्ही ना यात्रा काढणार, ना करमणूकीचे कार्यक्रम घेणार', सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास साधणे हा या उमेदवारांचा मुख्य उद्देश असेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला.चांगले, सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय उमेदवार देऊन आम्ही फक्त दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा, सुरक्षित जीवन देण्याचा प्रयत्न करणार,असे आनंद दवे यांनी सांगितले. 

या वेळी हिंदू महासभेचे प्रदेश सहकार्यवाह मनोज तारे, प्रदेश सरचिटणीस नितीन शुक्ल, प्रदेश संघटन प्रमुख उमेश कुलकर्णी, प्रदेश महिला समन्वयक सौ.अदिती जोशी, तसेच महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा भोसले-बुडुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.उर्वरित प्रभागांसाठी उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवडणूक प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार असल्याची माहिती हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती