सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं
  • आशिष शेलारांना भाजपमध्ये वाईट वागणूक मिळते, त्यांना काउंसलिंगची गरज; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
 विश्लेषण

भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पोर्ट व शिपिंग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांची ट्रान्सपोर्ट भवन दिल्ली येथे घेतली भेट.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    19-12-2025 10:56:01

उरण : भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पोर्ट व शिपिंग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांची ट्रान्सपोर्ट भवन दिल्ली येथे भेट घेतली.यावेळी पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील,राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत,अध्यक्ष श्रीकांत राय व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या चर्चेत पोर्ट कामगारांच्या वेतन करारातील राहिलेले विषयांवर चर्चा होऊन द्विपक्षीय वेतन करार समितीच्या सब कमिटीच्या रिपोर्टची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी असे सांगितले.बोनस कराराची पूर्तता करावी,स्टॅगनेशन, निवृत्त कामगारांच्या पेन्शन तसेच सर्व मेजर पोर्ट मध्ये सीक्रेट बॅलेट पद्धतीने कामगार वेरिफिकेशन व्हावे ह्या विषयांवर चर्चा झाली.तसेच सी फेरर्स च्या वतीने अक्षय बिरवाडकर व कॅप्टन इंदुलकर हे उपस्थित  होते, त्याच्या देखील समस्यांबाबत चर्चा झाली.मंत्री महोदयांनी सर्व विषय समजून घेऊन संबंधित अधिकारीवर्गाला सूचना केल्या व भारतीय मजदूर संघाला सर्वोपरी सहकार्य असेल असे सांगितले.

 


 Give Feedback



 जाहिराती