सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं
  • आशिष शेलारांना भाजपमध्ये वाईट वागणूक मिळते, त्यांना काउंसलिंगची गरज; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
 व्यक्ती विशेष

माणिकराव कोकाटेंची प्रकृती बिघडली; अँजिओग्राफीसाठी नेलं, लीलावती रुग्णालयात पत्नी व मुलगी उपस्थित

डिजिटल पुणे    19-12-2025 12:21:14

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने कोकाटे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आज त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष देखरेख करण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफीचा निर्णय घेण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रुग्णालयात कोकाटे यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत.दरम्यान, कोकाटे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) बजावण्याच्या प्रक्रियेवरही चर्चा सुरू आहे. वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेता हे वॉरंट रुग्णालयातच बजावले जाण्याची शक्यता आहे. यासाठी नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात दाखल झाली आहे.

विजय कोकाटेंचा शोध सुरू

या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी नाशिक पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती