सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

नचिकेत पटवर्धन आणि दिवाकर निमकर यांना जीवन गौरव जाहीर; 'एईएसए जीवन गौरव पुरस्कार -२०२६'जाहीर

डिजिटल पुणे    14-01-2026 14:13:08

पुणे : आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए ) यांच्या वतीने  मानाचे 'एईएसए जीवन गौरव  पुरस्कार -२०२६' जाहीर झाले  असून, यावर्षी हा सन्मान ज्येष्ठ वास्तुविशारद  नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना देण्यात येणार आहे. वास्तुरचना  व अभियांत्रिकी क्षेत्रात,एईएसए  संस्थेमध्ये तसेच पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या दीर्घकालीन व मोलाच्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात येत आहे.ज्येष्ठ अभियंता आणि एस.जे.काँट्रॅक्टस प्रा.लि.चे संचालक सुहास जंगले,ज्येष्ठ आर्किटेक्ट व्ही.व्ही.बडवे,ज्येष्ठ अभियंता सी.ई.गोडसे यांच्या हस्ते जीवनगौरव प्रदान करण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा शुक्रवार, दि.१६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता  आयोजित करण्यात आला असून, 'सॉलिटेअर' यांच्या सहकार्याने  पीवायसी हिंदू जिमखाना टेरेस, भांडारकर रस्ता  येथे  होईल.प्रवेश निमंत्रितांसाठी आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद  संध्या शहा यांच्या ‘नरी गांधी :द डिव्हाईन आर्किटेक्ट ऑफ ऑरगॅनिक फॉर्म' या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन यावेळी होणार असून, या प्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद  मनीष बँकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए ) चे अध्यक्ष महेश बांगड यांनी ही माहिती दिली.     

*पुण्याच्या विकासात ५६ वर्षांचे योगदान*:

'आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन'(ए ई एस ए ), पुणे ही शहराच्या सर्वांगिण सुधारणेसाठी सर्व प्रकारच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी १९७० मध्ये स्थापन झालेली एक आगळीवेगळी संस्था आहे. ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय, आणि स्थानिक सरकारी संस्थांबरोबर सामंजस्याने काम करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते. यामुळे असोसिएशनला आणि जीवनगौरव पारितोषिकांना बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान आहे.

वास्तुकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च दर्जा आणि उत्कृष्ट गुणवत्तेचा गौरव करून हे काम समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने 'आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन' ही पारितोषिके देत आहे. वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियंते, विकसक तसेच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गौरवास तसेच आदरास ही पारितोषिके पात्र झाली आहेत.


 Give Feedback



 जाहिराती