सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने चला आज्जी आजोबा मतदान करायला उपक्रम...

डिजिटल पुणे    15-01-2026 16:09:04

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड निवडणूक साक्षरता मंडळ, युथ रेड क्रॉस युनिट अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तथा निवडणूक अधिकारी पुणे, २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी व पुणे महानगरपालिका कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक १०,११ व ३१ मध्ये पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविद्यालयांतील  निवडणूक साक्षरता मंडळातील स्वयंसेवक विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी पुणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे व पुणे महानगरपालिका कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय  यांच्या वतीने चला आज्जी आजोबा मतदान करायला उपक्रमांतर्गत दिव्यांग मतदार, गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करण्यास मदत करण्यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. या मतदारांकरिता मतदान केंद्रावर व्हीलचेअर ची सोय करण्यात आली होती या व्हीलचेअरच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यास मदत करण्यात आली. विद्यार्थी मतदानासाठी जेष्ठ नागरिकांना करत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले व्यक्त केले.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक साक्षरता मंडळ नोडल अधिकारी डॉ.अशोक शेळके विद्यार्थी प्रतिनिधी पांडुरंग हिंगे, सुजल घोडके, अनिशा मरळ, सानिका पलांडे यांनी संयोजन केले. 
 


 Give Feedback



 जाहिराती