पिंपरी-चिंचवड दि. १६ जानेवारी :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शहरात झालेल्या मतदानात यंदा फक्त ५७.७१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २०१७ मध्ये हेच मतदान ६७ टक्के होते, त्यामुळे यंदा तब्बल ९.२९ टक्क्यांची घट झाली असून, या घसरलेल्या मतदानाचा राजकीय फायदा नेमका कुणाला होणार, हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारी साधारण २ वाजेपर्यंत बहुतेक प्रभागांचे स्पष्ट निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.
प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी
• प्रभाग क्र. १ – ६०.६१%
• प्रभाग क्र. २ – ६४.११%
• प्रभाग क्र. ३ – ६०.२७%
• प्रभाग क्र. ४ – ५७.०८%
• प्रभाग क्र. ५ – ६२.८८%
• प्रभाग क्र. ६ – ५५.७२%
• प्रभाग क्र. ७ – ५८.३७%
• प्रभाग क्र. ८ – ६०.२९%
• प्रभाग क्र. ९ – ६६.११%
• प्रभाग क्र. १० – ४२.४४%
• प्रभाग क्र. ११ – ४४.७९%
• प्रभाग क्र. १२ – ६५.३५%
• प्रभाग क्र. १३ – ४४.२७%
• प्रभाग क्र. १४ – ४३.४४%
• प्रभाग क्र. १५ – ५५.५६%
• प्रभाग क्र. १६ – ६२.४५%
• प्रभाग क्र. १७ – ६०.०४%
• प्रभाग क्र. १८ – ४६.१८%
• प्रभाग क्र. १९ – ४४.२२%
• प्रभाग क्र. २० – ५५.४२%
• प्रभाग क्र. २१ – ५६.७६%
• प्रभाग क्र. २२ – ६०.२८%
• प्रभाग क्र. २३ – ६३.३७%
• प्रभाग क्र. २४ – ६१.७२%
• प्रभाग क्र. २५ – ६०.४८%
• प्रभाग क्र. २६ – ५५.३०%
• प्रभाग क्र. २७ – ६१.०२%
• प्रभाग क्र. २८ – ४८.८८%
• प्रभाग क्र. २९ – ४८.५९%
• प्रभाग क्र. ३० – ४८.२२%
• प्रभाग क्र. ३१ – ५२.००%
• प्रभाग क्र. ३२ – ५७.५९%
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी – शहरात थेट लढत
यंदाच्या निवडणुकीत शहरातील मुख्य लढत ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली होती. बहुतांश प्रभागांमध्ये हीच थेट टक्कर पाहायला मिळाल्याने निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड Exit Poll 2026
दरम्यान, डिजिटल पुणे न्यूजच्या Exit Poll 2026 नुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डिजिटल पुणे न्यूज Exit Poll अंदाजानुसार :
• भाजप : ७५ ते ८० जागा
• राष्ट्रवादी काँग्रेस : ३५ ते ४० जागा
• शिवसेना / इतर पक्ष / अपक्ष : ८ ते १८ जागा
कमी मतदानाचा फायदा तुलनेने संघटित मतदान असलेल्या प्रभागांमध्ये भाजपला, तर काही भागांत स्थानिक समीकरणांमुळे राष्ट्रवादीला होऊ शकतो, असा अंदाज प्राब संस्थेने व्यक्त केला आहे.
मतदान का घटले?
• आयटी व खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळ न मिळणे
• शहरी मतदारांमधील राजकीय उदासीनता
• प्रचाराचा अतिरेक व मतदारांचा कंटाळा
• स्थलांतरित लोकसंख्या
• तरुण मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात कमी सहभाग
एकीकडे मतदानाचा टक्का ५७.७१% पर्यंत घसरलेला, तर दुसरीकडे भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील चुरशीची लढत — या पार्श्वभूमीवर आज दुपारपर्यंत येणारे निकाल पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
Exit Poll अंदाज कितपत खरे ठरतात आणि मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला आहे, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.