सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 विश्लेषण

मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; पोलिसांकडून शिवसेना कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

डिजिटल पुणे    16-01-2026 11:45:15

छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी काल (15 जानेवारी) मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात होत असतानाच शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर पोलिस आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली आहे.

उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या प्रवेशावरून वाद

मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यावरून उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारवाईत शिवसेनेचा कार्यकर्ता विकास जैन याला मारहाण झाल्याचं समोर आलं असून, त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण स्पष्टपणे दिसत आहेत.

परिसरात तणावाचे वातावरण

मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच झालेल्या या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.

हर्षदा शिरसाट यांचा आक्रमक पवित्रा

या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या स्वतः मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या.“ज्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होऊ देणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.“कारवाई होईपर्यंत कोणत्याही प्रतिनिधीला आत प्रवेश देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केल्याने परिस्थिती अधिक चिघळली.

गरवारे मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी

दरम्यान, शहरातील गरवारे मतदान केंद्रावरही आज प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने लोक अचानक मतदान केंद्रात शिरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतदान केंद्राच्या आत बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही उमेदवारांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रियेवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून गर्दी आवरण्याचे प्रयत्न सुरू असून, संपूर्ण घटनेवर प्रशासनाची नजर आहे.


 Give Feedback



 जाहिराती