सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात भाजपची धडाकेबाज आघाडी;;पहिल्याच कलांमध्ये बहुमताचा टप्पा पार नागपूर महापालिकेत भाजप आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

डिजिटल पुणे    16-01-2026 12:25:03

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपने पहिल्याच कलांपासून दमदार आघाडी घेतली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपने थेट बहुमताचा आकडा गाठत 74 जागांवर आघाडी मिळवली आहे.भाजपच्या या मुसंडीमुळे नागपूर महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

काँग्रेसला 25 जागांवर यश, इतर पक्ष पिछाडीवर

भाजपनंतर काँग्रेसने 25 जागांवर यश मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र सत्तास्थापनेच्या शर्यतीत काँग्रेस भाजपपेक्षा बरीच मागे असल्याचं चित्र आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं खाते उघडत 1 जागेवर आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती असल्याने भाजपची ताकद अधिक वाढलेली दिसत आहे.

सकाळी 11 वाजताच्या कलानुसार पक्षनिहाय स्थिती

भाजप – 74

काँग्रेस – 25

शिवसेना (शिंदे गट) – 1

शिवसेना (UBT) – 1

राष्ट्रवादी – 1

बसपा – 1

इतर – 4

राष्ट्रवादी SP – 0

151 जागांसाठी आज फैसला; 51 टक्के मतदान

नागपूर महापालिकेच्या 151 जागांसाठी 51% मतदान झाले होते. शहरातील 24 लाख मतदारांनी 993 उमेदवारांचे भवितव्य आज ठरवले आहे.मतमोजणीसाठी शहरात 10 ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यात आली असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर ईव्हीएम आणि टपाल मतदानासाठी स्वतंत्र टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजप विजयाच्या दिशेने, अंतिम निकालाची उत्सुकता

पहिल्या कलांमध्येच भाजपने स्पष्ट बहुमत गाठल्यामुळे नागपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.नागपूरच्या राजकारणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती