सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 विश्लेषण

महानगरपालिका निवडणूक २०२६ : 29 महापालिकांत भाजपची सरशी; अनेक ठिकाणी थरारक निकाल;शिंदे-भाजप आघाडीला बहुसंख्य महापालिकांत आघाडी

डिजिटल पुणे    16-01-2026 12:46:53

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांची सरशी दिसून येत आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक आणि थरारक निकाल समोर आले आहेत. मुंबईतील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला असून धारावीमधून आशा काळे विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकरांनी मोठा विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा अमरावतीत पराभव झाला आहे.पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना अमरावतीमधून पराभव पत्करावा लागला आहे. 

राज्यातील थरारक निकाल

 मुंबई – धारावीतील काँग्रेसचा पहिला विजय

प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे यांनी 1450 मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.

 तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय

मुंबईतील प्रभाग क्रमांक 2 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी 10,755 मतांनी विजय मिळवला. त्यांनी ठाकरे गटाच्या फोरम परमार आणि काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांचा पराभव केला.

 कप्तान मलिकांना धक्का

प्रभाग क्रमांक 165 मधून काँग्रेसचे अशरफ आझमी विजयी झाले. त्यांनी नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव केला.

 कल्याण-डोंबिवलीत मनसेचा पहिला विजय

मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय मिळवत पक्षाचा खाते उघडलं.

 कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का

प्रभाग क्रमांक 9 मधून शिंदे गटाचे शारंगधर देशमुख विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे राहुल माने यांचा पराभव केला. हा निकाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांना धक्का मानला जातो.

 पुण्यात प्रशांत जगताप विजयी

शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक 18-ड मधून विजयी झाले.

 मुख्यमंत्र्यांच्या मामेभावांचा पराभव

अमरावतीतील प्रभाग क्रमांक 14 मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला. या प्रभागात काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले.

 शिरसाट कुटुंबाचा विजय

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी – दोघेही विजयी झाले.

रविकांत वायकरांना धक्का

मुंबईत शिंदे गटाचे खासदार रविकांत वायकर यांच्या मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव झाला. येथे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला.


 Give Feedback



 जाहिराती