पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता१५) रोजी मतदान पार पडलं, त्याचा निकाल आज (१६ जानेवारी रोजी) जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या दोघींचा निकाल आता समोर आला आहे. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती, मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.या प्रभागात एक जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली आहे, तर बाकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत.\
रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव
सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाली आहे. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. सोनाली आंदेकरने तुरुंगातुन निवडणूक लढवली होती. हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील आरोपी आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी (ता. १५ जानेवारी) मतदान पार पडल्यानंतर आज (शुक्रवार, ता. १६) निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेचा निकाल विशेष चर्चेत ठरला असून, आंदेकर कुटुंबातील उमेदवारांच्या विजयानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक २३ मधून या दोघींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. निकालात सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी झाल्या आहेत.
तुरुंगातून लढवली निवडणूक
सोनाली आंदेकर या दिवंगत वनराज आंदेकर यांच्या पत्नी असून, त्या आयुष कोमकर हत्याप्रकरणातील आरोपी आहेत. लक्ष्मी आंदेकर या देखील याच प्रकरणात तसेच ५ कोटी ४० लाखांच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघींनीही तुरुंगातूनच निवडणूक लढवली.
विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी देत लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. २७ डिसेंबर रोजी त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, बंडू आंदेकर यांना मिरवणूक, भाषण व घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने मनाई केली होती.
गुन्हेगारीमुक्त पुण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास लक्षात घेता, त्यांच्या विजयानंतर “पुण्यात गुन्हेगारी कमी होणार की वाढणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.“पुणे गुन्हेगारीमुक्त करणार” असा दावा करणाऱ्या अजित पवारांच्या भूमिकेवर विरोधकांकडून आधीच टीका झाली होती. या निकालानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.