सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

‘पु. ल. कट्ट्या’वर ६ फेब्रुवारीला लतादीदींच्या सूरांचा जागर; संगीतप्रेमी आणि रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

डिजिटल पुणे    05-02-2026 15:48:20

मुंबई : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पु. ल. कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आवाजातील अजरामर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणातील खुल्या रंगमंचावर या कार्यक्रमाचे सादरीकरण शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेली निवडक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गीते आणि त्यांच्या अतुलनीय कारकीर्दीवरील मान्यवरांची मनोगतेही दृकश्राव्य स्वरूपात सादर होतील.  त्याचबरोबर, ज्येष्ठ संगीत रसिक, नौशाद संगीत समितीचे काका जे. पी. यांच्याकडून दीदींच्या आयुष्यातील काही दुर्मिळ आठवणी, प्रसंग प्रत्यक्ष ऐकायला मिळतील.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व संगीतप्रेमी आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. कलेचा आनंद, विचारांची मेजवानी आणि सुरांची मैफल अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती