सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

भाजपच्या उमेदवारांना जनतेची सर्वाधिक पसंती;भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून येणार

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    05-02-2026 16:51:24

उरण :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ उमेदवार निवडण्याची नसून परिसराच्या विकासाची, मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे.भारतीय जनता पार्टीकडून नवघर जिल्हा परिषद  श्रीमती प्रभावती भोईर, भेंडखळ पंचायत समिती मधून मिलिंद पाटील तर नवघर पंचायत समिती साठी उभे असलेले उमेदवार हरेश शेठ भोईरहे तिन्ही कर्तव्यदक्ष उमेदवार आमदार महेश शेठ बालदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत.विजय विकास सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.गोरगरिबांना मदत, युवकांना प्रोत्साहन, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक विजय भोईर यांनी बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून केलेली प्रामाणिक सेवा सर्वांना परिचित आहे. आज गरज आहे ती अनुभव, काम आणि विश्वास असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे.“जिथे विश्वास तिथे विकास” “आजचा योग्य मतदान, उद्याचा उज्ज्वल भविष्य” म्हणूनच,या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा वाढला असून हे उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी चर्चा जनतेतून सुरु आहे.


 Give Feedback



 जाहिराती