सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 विश्लेषण

इतिहास आणि पर्यावरणासाठी भारती विद्यापीठाचा कात्रज तलावावर उपक्रम

डिजिटल पुणे    19-02-2026 18:13:55

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक कात्रज तलाव परिसर मंगळवारी सकाळी सामाजिक जाणीवेच्या ऊर्जेने उजळून निघाला. भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित एकदिवसीय ऐतिहासिक स्थळ संवर्धन उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वारसा जतन आणि स्वच्छतेची जाणीव दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.स्वयंसेवकांनी परिसरातील प्लास्टिक व घनकचरा गोळा करत स्वच्छता मोहीम राबवली. उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक स्थळांचे जतन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी जनजागृती करण्यात आली. “आपला वारसा, आपली जबाबदारी” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

“इतिहासाचा वारसा जपणे आणि पर्यावरण संवर्धन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक सजग नागरिकाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी केले.उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे आणि उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी विद्यार्थिनींना सामाजिक सहभागाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकरकर यांची उपस्थिती उपक्रमाला प्रेरणादायी ठरली. कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. सीमा हाडके यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदविला.

या उपक्रमात भारती विद्यापीठ फाईन आर्ट्स महाविद्यालय, सौ. काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव तसेच सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक जबाबदारीची भावना कृतीतून व्यक्त केली.

स्वच्छता मोहिमेनंतर महाविद्यालयात पोस्टर निर्मिती आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी केली. या सर्जनशील उपक्रमामुळे संवर्धनाची भावना केवळ कृतीत नव्हे तर विचारांतही रुजली.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला, मात्र या उपक्रमातून जागवलेली जाणीव आणि प्रेरणा समाजमनात दीर्घकाळ टिकून राहील, याची खात्री व्यक्त करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती