सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 विश्लेषण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारीचा ₹1500 हप्ता जमा होण्यास सुरुवात; आतापर्यंत 19 हप्ते वितरित

डिजिटल पुणे    24-02-2026 12:59:43

मुंबई : राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1500 हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने 23 जानेवारीपासून रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली आहे. सोमवारी रात्रीपासून अनेक महिलांना रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत.

98 कोटींचा निधी वर्ग

जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला सुमारे 98 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. निधी प्राप्त झाल्यानंतर हप्त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

लाभार्थी संख्येत घट

डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारीच्या मध्यात सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.

योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली तेव्हा सुमारे 2 कोटी 46 लाख महिला नोंदणीकृत होत्या. शासनाने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुमारे 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी योग्य माहिती भरलेल्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता देण्यात आला.

ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी

ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडलेल्या महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थींनी वेळेत माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत किती हप्ते?

जुलै 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंत एकूण 19 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरमहा ₹1500 प्रमाणे ही आर्थिक मदत दिली जाते.दरम्यान, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे दरमहा ₹500 इतकी मदत दिली जाते.लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आणि मोबाईल संदेश तपासून रक्कम जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती