सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 DIGITAL PUNE NEWS

येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

डिजिटल पुणे    12-03-2026 15:50:32

मुंबई : येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने उपलब्धता करावी तसेच या सुविधा उपलब्ध करुन देईपर्यंत उद्योजकांना विनाशुल्क मुदतवाढ द्यावी,असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.मंत्रालयात येवला औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांच्यासह एमआयडीसीसह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, येवला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या वसाहतीचा पूर्ण क्षमतेने विकास करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या वसाहतीतील उद्योजकांना पाण्याची उपलब्धता तातडीने करुन देण्यात यावी, यासाठीची आवश्यक कार्यवाही करत असतानाच याठिकाणी पाणी पुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यासाठी सुरू असलेल्या कामालाही गती द्यावी. त्याचप्रमाणे या वसाहतीतील वीजेचा पुरवठा आणि रस्त्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे. या सर्व सुविधांची उभारणी होईपर्यंत याठिकाणी नोंदणी केलेल्या उद्योजकांना व्यवसाय उत्पादन सुरु करण्यासाठीच्या कालावधीला विनाशुल्क मुदतवाढ देण्यात यावी. या उद्योजकांच्या उद्योग बांधकामासाठी दोन वर्षाचा कालावधी वाढवून द्यावा. त्यासोबतच याठिकाणच्या मूलभूत सोयी सुविधांची तातडीने कायमस्वरुपी उभारणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन या कामाला गती देण्याच्या सूचना मंत्रीभुजबळ यांनी यावेळी दिल्या.

येवला औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाचा प्रचलित दर जास्त असल्यामुळे या ठिकाणी उद्योजक गुंतवणूकीसाठी आकृष्ट होत नाही. त्यामुळे या प्रचलित दरामध्ये किमान ५० टक्के सवलत देण्यात यावी. तसेच या ठिकाणी मोठा उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी केल्या. येवला औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेत यंत्रणांना त्या तत्परतेने सोडवण्याचेही मंत्री भुजबळ यांनी सूचित केले.


 Give Feedback



 जाहिराती