सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 क्राईम

पुणे पोलिसांची कारवाई : चेन स्नॅचिंग व पोलिस बतावणी करून फसवणूक करणारा ८ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

डिजिटल पुणे    12-03-2026 17:16:36

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक–२ ने मोठी कारवाई करत चेन स्नॅचिंग तसेच पोलिस बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार नितीन मुंडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी पुण्यातील रा.पेरर वस्ती, लोहगाव परिसरात राहत असल्याचे समजले.

सदर माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने (खंडणी विरोधी पथक–२) यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत आरोपीवर शिरूर पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 204, 356, 379, 34 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.तसेच आरोपीवर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग, पोलिस बतावणी, वाहन चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

ही कारवाई मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मा. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस अंमलदार नितीन मुंडे, कारसले, जगताप आणि गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


 Give Feedback



 जाहिराती