सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 क्राईम

पर्वती परिसरात देशी पिस्तूलसह तरुण जेरबंद; पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    14-03-2026 18:58:41

पुणे : पुणे शहरातील पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवण्यासाठी जवळ बेकायदेशीर देशी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 13 मार्च 2026 रोजी पर्वती पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी किरण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अजित सागर कसबे (वय 29, रा. विठ्ठलदास सोसायटी, फ्लॅट नं. 404, आंबेगाव पठार, धंकवडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीकडून अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 68/2026 नोंद करण्यात आला असून आरोपीवर भारतीय शस्त्र कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगुंडे, महेश मंडलिक, सूर्य जाधव, अमित विटे, मनोज बनसोडे, राकेश सुर्वे, सहादेव शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

पर्वती पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती