सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 क्राईम

धुळ्यात धक्कादायक घटना: गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन, १८ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

डिजिटल पुणे    15-04-2026 16:49:35

धुळे: धुळे शहराजवळील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला देवपूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत ती सुमारे २४ आठवड्यांची (सहा महिने) गर्भवती असल्याचे समोर आले. गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली.

दरम्यान, औषधांचे प्रमाण अधिक झाल्याने तिचा रक्तदाब झपाट्याने खाली आला आणि तिला झटके येऊ लागले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात भेट देत प्राथमिक नोंद केली. या प्रकरणात तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी दिल्या, यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती