सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 DIGITAL PUNE NEWS

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

डिजिटल पुणे    23-04-2026 14:04:04

मुंबई  : नाशिक येथील मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेने उल्लेखनीय यश मिळवले असून या केंद्रातून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) साठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थिनींनी देशपातळीवर मुलींमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पंधरावा क्रमांक मिळवला आहे. देशभरातून केवळ १९ मुलींची एनडीएसाठी निवड होत असताना नाशिकच्या या केंद्राने मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.

निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये कुमारी जिया सचिन करपे हिने मुलींमध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर कुमारी समृद्धी प्रविण इंगळे हिने १५ वा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून नाशिक येथे १८ जून २०२३ रोजी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. राज्यातील मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून संधी मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या संस्थेत इयत्ता ११वी व १२वीच्या विद्यार्थिनींना दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम दिला जातो. या संस्थेची स्थापना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभाग असताना करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे मुलींसाठी एनडीए भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे हे देशातील पहिलेच केंद्र आहे.

यापूर्वीही या संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली असून मागील वर्षी हंसिका टिल्लू हिची एनडीए साठी निवड झाली होती. यंदा दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाल्यामुळे या संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.नाशिकमधील हे केंद्र भविष्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती