उमरगा : चौरस्ता, गुलबर्गा रोड येथील निसर्गरम्य परिसरात ‘ओम लॉन्स अँड रिसोर्ट’चे भव्य उद्घाटन समारंभ तसेच शांतीदूत परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाकाकी रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती लताताई मोरे, तसेच उमरगा पंचायत समितीच्या सभापती आकांक्षा चौगुले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचा सत्कार शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव (IPS), मराठवाडा अध्यक्ष प्रा. जीवन जाधव, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला आणि जिल्हाध्यक्ष प्रा. अभयकुमार हिरास यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उमरगा पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आणि माजी नगराध्यक्षा सुलक्षणा शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. कुमारी प्राची मुकटे (CBSE दहावी परीक्षेत ९९.२०% गुण), डॉ. श्रीकांत गायकवाड (विद्यार्थीप्रिय प्राचार्य), श्री. रत्नाकर सगर (नगरसेवक, उमरगा) आणि श्री. आयुब (उद्योजक) यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जीवन जाधव यांनी केले. त्यांनी शांतीदूत परिवाराच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत ‘ओम लॉन्स अँड रिसोर्ट’मुळे परिसरात एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितले. सेवानिवृत्त IPS अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव यांनी लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अभयकुमार हिरास यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व निसर्गरम्य ठिकाणाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

