सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 क्राईम

भोरमधील नसरापूर हादरलं! चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; सीसीटीव्हीतून आरोपीचा माग काढत पोलिसांची जलद कारवाई

डिजिटल पुणे    02-05-2026 18:10:43

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास राम मंदिर परिसरातून ही चिमुकली अचानक बेपत्ता झाली. ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एक संशयित व्यक्ती मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसून आली. यानंतर संशय अधिक बळावला.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संशयिताला बनेश्वर फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने सांगितलेल्या ठिकाणी, गोठ्यातील शेणाखाली लपवलेला मुलीचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर नसरापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन छेडले. बेंगळुरू-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, तसेच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास घटना घडली असून सव्वा पाच वाजता पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दीड तासाच्या आत आरोपीला अटक केली. सध्या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तपासात उघड झाले आहे की, आरोपी हा सुमारे ६५ वर्षीय असून तो परिसरात मजूर म्हणून काम करत होता. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल होते—१९९८ मध्ये विनयभंग आणि २०१५ मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता. २०१९ मध्ये त्याची सुटका झाली होती.

ही चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती