सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 क्राईम

नसरापूर हादरलं: 20 वर्षांपूर्वी गावातून हाकललेला आरोपीच शोधमोहीमेत सहभागी; सीसीटीव्हीमुळे उलगडला थरारक गुन्हा

डिजिटल पुणे    04-05-2026 10:51:36

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याच्या विकृत वर्तणुकीमुळे त्याला सुमारे 20 वर्षांपूर्वी मूळ गाव साळवडे येथून गावकऱ्यांनी हाकलून दिलं होतं.

गावाबाहेर काढल्यानंतर आरोपी नसरापूरमध्ये राहत होता आणि इथेच छोटेमोठे काम करून गुजराण करत होता. विशेष म्हणजे, चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर गावकरी तिचा शोध घेत असताना आरोपीही त्या शोध पथकात सहभागी झाला होता. मात्र, काही ग्रामस्थांना त्याच्या बोलण्यात विसंगती जाणवल्याने संशय बळावला आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्याच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल होते, ज्यातून तो सुटला होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. मात्र, मंदिराजवळील एका घरातील बॅटरीवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीची हालचाल कैद झाली. या महत्त्वाच्या पुराव्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं.या अमानुष घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून, आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती