सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 क्राईम

नसरापूर प्रकरण: चिमुरडीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक तपशील उघड; राज्यभर संताप

डिजिटल पुणे    05-05-2026 11:13:39

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आता शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यातून अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या घटनेमुळे आधीच संतप्त असलेल्या राज्यातील नागरिकांमध्ये आणखी रोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला फसवून एकांत ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मुलीच्या शरीरावर गंभीर दुखापतींचे संकेत आढळले असून, घटनेच्या वेळी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सगळ्या तपशीलांवरून गुन्ह्याची क्रूरता अधोरेखित होत आहे.

ही चिमुरडी आपल्या पालकांसोबत पुण्यात राहत होती आणि उन्हाळी सुट्टीसाठी नसरापूर येथे आजोळी आली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीविरुद्ध यापूर्वीही महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर परिसरात तसेच राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्या पोलिसांकडून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, आरोपीची वैद्यकीय तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती