सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 विश्लेषण

‘वंदे मातरम्’चा अवमान गुन्हा ठरणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 3 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

डिजिटल पुणे    06-05-2026 14:35:29

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ या कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली असून, आता या कायद्यांत ‘वंदे मातरम्’चाही समावेश केला जाणार आहे.

या बदलानंतर राष्ट्रीय गीताचा अवमान, त्यावेळी अडथळा निर्माण करणे किंवा अनादर दाखवणे हा दंडनीय गुन्हा ठरेल. अशा प्रकारच्या कृत्यासाठी 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद लागू होणार आहे. सध्या ही शिक्षा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेच्या अवमानासाठी लागू आहे.

दरम्यान, गृह मंत्रालयाने याआधीच ‘वंदे मातरम्’ संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. अधिकृत कार्यक्रमांमध्ये हे गीत पूर्ण सहा कडव्यांसह सादर करावे, असा सल्ला देण्यात आला होता. तसेच, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वाजवायचे असल्यास ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते.

आतापर्यंत या सूचना केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या; मात्र कायद्यातील सुधारणेमुळे त्यांना आता कायदेशीर बळ मिळणार आहे.‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 19व्या शतकात लिहिले असून ते त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यलढ्यात या गीताने महत्त्वाची प्रेरणा दिली होती.


 Give Feedback



 जाहिराती