सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; तुम्हाला सोडणार नाही, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिल्याचा संजय राऊतांचा दावा
  • NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी
 DIGITAL PUNE NEWS

मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पुस्तिकेचे आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते प्रकाशन

डिजीटल पुणे    13-06-2026 15:42:26

पुणे : महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गावामधील विविध घटकांचे सर्वेक्षण, विश्लेषण करून त्याचा अहवाल पुस्तक रूपाने तयार केला जातो. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात मु. पो. सुकलवाडी ता. पुरंदर या ठिकाणी असणा-या माती, पाणी, वनस्पती, आर्थिक, सामाजिक, राजकीय माहितीचे पुस्तक तयार करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अर्चना श्रीचिप्पा, प्रा. ऋषिकेश मोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. सविता कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 5 गावांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण करून त्याची माहिती पुस्तक रूपाने तयार करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. सदर पुस्तकासाठी राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य क्षेत्रीय संचालक श्री. अजय शिंदे यांची प्रस्तावना तसेच राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन डॉ. मिलींद काळे यांनी शुभेच्छा संदेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुस्तकामध्ये विविध विषयाचे १६ लेख असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञानही मिळते. विद्यार्थी आणि प्राध्यापकांची संशोधनवृत्ती वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविद्यालयाचे वैविध्यपूर्ण उपक्रमांबद्दल कौतुक केले. आणि विद्यार्थी, शिक्षक, समाज, ग्रामस्थ यांना एकत्र आणण्यासाठी आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने नियोजनासाठी हे महत्त्वाचे पाउल असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. प्रशांत मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती