सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
  • सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
  • उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट अदृश्य होत जाणं हा संजय राऊतांचा भीम पराक्रम, मंत्री जयकुमार गोरेंचा टोला
  • खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
 DIGITAL PUNE NEWS

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

MSK    23-06-2026 11:30:00

मुंबई, दि. 22 जून : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 होती. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन ही मुदत आता 2 जुलै 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंतिम मुदतीपर्यंत 1 लाख 45 हजार 708 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1 लाख 15 हजार 53 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

सुधारित अंतिम तारीख 02 जुलै 2026  करण्यात आली आहे  तरीही इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत

प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी dte.maharashtra.gov.in या  संकेतस्थळ ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती