सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 जिल्हा

मुंबईत थरार! गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली BEST बसला भीषण आग; धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ

डिजिटल पुणे    04-09-2026 18:58:39

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरात शुक्रवारी एका BEST बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली. बसला लागलेली आग काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात पसरली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.

मेट्रो स्टेशनमध्ये धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ

ही घटना मेट्रो मार्गिका 7 वरील ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्टेशनच्या खाली घडल्याची माहिती आहे. BEST बसला आग लागल्यानंतर निर्माण झालेला दाट धूर वर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात पोहोचला. त्यामुळे स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

धूर वाढताच अनेक प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेशनबाहेर धाव घेतली. काही काळ मेट्रो स्टेशन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.

मेट्रो सेवेत खबरदारीचा बदल

आगीमुळे मेट्रो मार्गिकेवरही त्याचा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून मेट्रो प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. धुराचे प्रमाण कमी होईपर्यंत मार्गिकेवरील दोन स्थानकांवर मेट्रोला थांबा दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान, वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहने थांबवण्यात आल्याने महामार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, तसेच बसला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती