पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कृष्ण रंग – एक आनंदानुभव’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार,दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य हेमंत पेंडसे यांची संकल्पना, संगीत आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमात कृष्णभक्ती या विषयावर आधारित शास्त्रीय व उपशास्त्रीय रचनांचे सादरीकरण होणार आहे.
या रचना हेमंत पेंडसे यांच्यासह सौ. मीनल दातार आणि सौ. मनिषा निश्चल सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील, हार्मोनियमवर मीनल नांदेडकर आणि पखवाजवर राजगोपाल साथसंगत करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ३०६ वा कार्यक्रम असून प्रवेश विनामूल्य आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली .