सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेत विमान वाहतूक सेवा कोलमडली! सर्व विमान उड्डाणे अचानक रद्द,प्रशासनाकडून देशव्यापी ग्राउंड स्टॉपचा आदेश,हजारो प्रवासी अडकले
  • सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
  • पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने निलंबित
  • वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
 विश्लेषण

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 'सांज दिवाळी'- गीतगुंजन या सुरील मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध!

डिजिटल पुणे    09-11-2026 14:29:19

वसमत : वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान,वसमत यांच्या आयोजित करण्यात आलेल्या 'सांज दिवाळी २०२६' या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी व मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीने वसमतकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात आयोजित या कार्यक्रमात 'गीतगुंजन' या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय हिंदी व मराठी चित्रपटगीतांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता आली. गायिका वर्षा जोशी (संभाजीनगर) आणि गायक वैभव पांडे यांनी आपल्या मधुर आवाजातून विविध लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे निवेदन श्रीकांत उमरीकर यांनी प्रभावी शैलीत केले. संगीताच्या साथीला राजू तायडे यांनी की-बोर्ड, जीवन कुलकर्णी यांनी तबला, तर अमित निर्मल यांनी ऑक्टोपॅडची व प्रबोध जोशी यांनी व्हायोलिन ची साथ देत कार्यक्रमात रंगत आणली.

दिवाळीच्या प्रकाशमय पर्वात संगीत, कला आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमामुळे वसमतच्या सांस्कृतिक वातावरणात आनंदाची भर पडली. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची संधी मिळण्याबरोबरच कला व संगीताची आवड जोपासण्यास प्रोत्साहन मिळते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे प्रा पंजाब अंभोरे, वसंत चेपूरवार, आनंद बडवणे, सुनील कबाडे,आदित्य देशपांडे प्रकाश इंगळे, मनोज चव्हाण, लक्ष्मीकांत धानोरकर, किरण कापूसकरी  जयश्री पाटील, साक्षी जोशी यांनी पुढाकार घेतला.

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान वसमत यांच्या पुढाकारातून आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याचे उपस्थित रसिकांनी विशेष कौतुक केले. संगीत, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक जाणीव समृद्ध करण्याचा प्रतिष्ठानचा हा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रम वसमतकरांसाठी आनंददायी ठरला. प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्य याही पुढे असेच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्नशील राहून सांस्कृतिक क्षेत्रात वसमत चा नावलौकिक वाढणार आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती