वाशिम : वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडेच्या अपहरणाच्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वाशिम – पुसद मार्गावर अनिकेत मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 12 मार्चला हे अपहरणाचे प्रकरण घडले होते. त्यानंतर पोलिसांना अनिकेतच्या शोधासाठी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू केला. मात्र तरीही अनिकेतचा थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली आहे. तर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तब्बल चार जिल्ह्यातील 12 पोलिस पथकं शोधकार्यात लावली होती. अखेर 9व्या दिवशी अनिकेतचा मृतदेह सापडल्याने साधुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
१२ मार्चच्या रात्री दोन वाजेपर्यंत मुलगा घरी न परतल्यानं वडिलांनी गावभर त्याचा शोध घेतला. त्याचवेळी, त्यांच्या घराजवळ त्यांना एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये ६० लाखांची मागणी करत, पैसे न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. घाबरलेल्या वडिलांनी तत्काळ अनसिंग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ अधिकाऱ्यांचं तपास पथक स्थापन करण्यात आलं. सायबर पोलीस आणि विविध जिल्ह्यांच्या पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
तपासाच्या सुरुवातीपासून पोलिसांना प्रणय पदमणे आणि शुभम इंगळे या दोघांवर संशय होता. चौकशीत वारंवार विसंगत जबाब आणि हालचालींमुळं पोलिसांनी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं. अखेर सखोल चौकशीत प्रणय पदमणेनं गुन्ह्याची कबुली दिली. त्यानं सांगितलं, "१२ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास, त्यानं शुभम इंगळेच्या मदतीनं मुलाला मिरवणुकीतून दुसऱ्या जागी नेलं. १३ मार्चच्या पहाटे १२:४५ वाजता त्याचा गळा दाबून खून करण्यात आला." आरोपींनी जुन्या वादातून आणि विकृत मानसिकतेतून ही हत्या केली. मात्र, तपासाची दिशा भरकटवण्यासाठी त्यांनी बनावट खंडणीची चिठ्ठी ठेवली होती.सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून यातील आरोपींचाही शोध घेतला जात आ