सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे आयोजीत “व्यवस्थापन ताणतणावाचे” या विषयावर सौ. श्रेया प्रविण जंगम यांचा लेख

डिजिटल पुणे    24-03-2025 18:04:08

"विषय व्यवस्थापन ताणतणावाचे"

आजच्या जीवनशैलीत ताण - तणाव हा जीवनाचा एक भाग बनला आहे. लाखो लोक दीर्घकालीन तणावामुळे त्रस्त असून त्यावर एकतर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो किंवा गोंधळात कसेबसे जीवन व्यथित केलं जातं.  सामान्यतः तणावाचे कारण कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या, समाज, आरोग्य किंवा करिअर असू शकते काही वेळा ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे  देखील उद्भवते आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे परिणाम होतो. आपण तणाव, नैराश्याने किंवा चिंताग्रस्त आहोत की नाही हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचे आहे. जर कोणीही तणावाच्या समस्येशी झुंज देत असाल तर काही खास आणि सोप्या मानसिक व्यायामांच्या मदतीनं आपण आपला तणाव दूर करू शकतो. काही गोही रोजच्या दिनचर्येत  समाविष्ट  करून काही मिनिटांपासून आराम मिळवता येऊ शकतो.

"काउंटडाउन'

जर तुम्ही बाहेर कुठे किंवा  मीटिंगमध्ये असाल, पण तुमचे मन तणावाने भरलेले असेल, तर स्वतःला आराम देण्यासाठी  १०० ते १ पर्यंत उलटे मोजत राहा असं केल्याने तुमचं मन तणावाची भावना कमी करू शकेल आणि तुम्हाला शांत वाटेल.

"ABCD म्हणा

हे थोडं विचित्र वाटेल, पण तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःला शांत करण्याचा हा एका सोपा मार्ग आहे. हेल्थ शॉटनुसारच्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या मेंदूच्या तर्कशुद्ध भागाचा वापर करून तणावमुक्त करू शकता.

*फोन आणि स्क्रीन ऐवजी संगीत/गाणी ऐका

जर तुम्ही फोन आणि स्क्रीनलर घालवण्याचा वेळ कमी केला तर तुमची तणावाची पातळी कमी होऊ शकते. आजकाल लोक काम करूनही मनोरंजनासाठी मोबाईलला चिकटलेले असतात. त्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि चांगली झोप न मिळाल्यास तणाव अधिक घातक ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही संगीत आणि गाणी ऐकणं चांगलं आहे.

"ध्यान करा -

तणाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी ध्यान खूप उपयुक्त आहे. यासाठी योगीसारखे ध्यान करणे आवश्यक नाही. दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे मन तुमच्या श्वासावर केंद्रित करा, दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ थांबा आणि पूर्णपणे श्वास सोडा. तुम्ही हे खाताना, पिताना, काम करताना, चालताना, संगीत ऐकताना, अगदी मीटिंगमध्ये किंवा झोपतानाही करू शकता.

"फिरायला जा 

जर तुम्ही दिवसा किंवा  रात्री कोणत्याही वेळी फिरायला गेलात आणि झाडे किंवा निसर्गात काही वेळ घालवला तर ते तुमचा ताण नियंत्रणाबाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे रोज चालत जा

श्रेया प्रविण जंगम, डोंबिवली

संपर्क क्रमांक: 9930741559


 Give Feedback



 जाहिराती