सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे आयोजीत “व्यवस्थापन ताणतणावाचे” या विषयावर सौ. स्नेहा प्रविण जंगम, यांचा लेख

डिजिटल पुणे    25-03-2025 18:32:45

*विषय: व्यवस्थापन ताणतणावाचे"

जीवनाच्या प्रत्येक अवस्थे मधून प्रवास करताना मग ते बाल व्यवस्थापन असो, विद्यार्थी व्यवस्थापन असो, तरुण व्यवस्थापन असो किंवा वृध्दापण  व्यवस्थापन असो..  वेगवेगळ्या टप्प्यांतून प्रवास करत असताना आपणांस विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. समोर येणाऱ्या समस्यांना सामोरे जात असताना जर आपल्याकडे शारीरिक ,मानसिक आर्थिक साधन सामुग्रीची उपलब्धता  कमी पडत असेल तर आपल्या मनावर त्याचा खूप परिणाम होत असतो. उदाहरणार्थ वाढता ब्लड प्रेशर, चिडचिडेपणा, चिंताग्रस्त होणे इत्यादी परिणाम होत असतात! हाताला घाम येणे , तणाव निर्माण होणे,  अशी बरीच लक्षणे यांचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. ताण तणाव  निवारणाचे तंत्र जर का आपणांस ठाऊक असते तर आपण निश्चितपणे आपला जीवनप्रवास सुख समाधानाचा आणि आनंददायी  करू शकलो असतो.

ताण तणाव दूर ठेवण्यासाठी दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत आणि ते म्हणजे "अंतर्गित घटक आणि "बाह्य घटक यातील बाह्यघटक म्हणजे  असे घटक जे आपल्या शरीरावर आणि मनावर  परिणाम घडवून आणू शकतात... उदा. जवळचे माणूस जाणे, नोकरी जाणे आणि इतर... अशा घटना आपल्या मनाचा ताबा घेऊ शकतात आणि त्याचा परिणा म्हणून ताणतणाव निर्माण होत असतो! अंतर्गिक घटक म्हणजेच दिनचर्या, घरातील माणसांचा विचार, स्वतःशी होणारा संवाद, इतरांसमोर मन मोकळे करणे आणि इतर...  या दोन्ही घटकांचा योग्य ताळमेळ साधण्याचे तंत्र अवगत करणे गरजेचे आहे! प्राथमिकता काय आहे ते ठरविता आले पाहिजे.

सर्वप्रथम, आपली दिनचर्या आपल्या नियंत्रणात हवी. पहाटे उठून, प्रातर्विधी उरकून घेऊन चांगली अंघोळ करून मेडिटेशन, योग, ध्यानधारणा व्यायाम इत्यादीसाठी अने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपला दिवस आनंदी जाण्यास नक्कीच मदत होते हे मी स्वतःच्या अनुभवानुसार अगदी खात्रीशीर पणे सांगू शकते आजचा दिवस किती छान आहे... मला खूप  आनंद प्रसन्न आणि उत्साही वाटत आहे... असे सकारात्मक विचार आपण सर्वांनी करायला हवेत. आपला आहार देखील काही वेळा तणावाचे कारण असतो. जेवण व्यवस्थित झाले नाही तर घरच्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात! त्यासाठी नेमकाच पण सकस, पचेल असा आहार घ्यावा शक्यतो पूर्ण शाकाहारी आहार असावा जेवणाच्या वेळा पाळायला प्याला आपले आवडते छंद जोपासणे हे देखील तणा विरहित जीवन जगण्यास फारच उपयुक्त ठरतं.

समाजाच्या दृष्टी  कोनातून बघायचे झालेच तर, अजूनही भारतीय नारी पूर्णपणे सुरक्षित नाही असेच म्हणावे लागेल ! एखादी अबला असहाय्य स्त्री भेटली कि तिची गरज ओळखून तिचा वापर करून घेण्यात येतो... मग ते घर असो, नोकरी व्यवसाय असो  अथवा समाजात वावरणे असो! जर का यात काही नकारात्मक घडलेच तर मग येणाऱ्या  ताणतणावाला सामोरे जावे लागते आणि त्यासाठीच अगोदर  लिहिल्याप्रमाणे स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन नेहमी असलाच पाहिजे !!!

आर्थिक दृष्ट्‌या सध्या सर्वजण सबळ आहेत असेच स्व अनुभया बरून म्हणावेसे वाटते... आता स्रिया देखील स्वतःच्या हिंमतीने नोकरी व्यवसाय सांभाळत आपले घर चालवतात... घराचा EMI , मुलांचे  शिक्षण, दवाखाना इत्यादी मुळे थोडा ताण तणाव निर्माण होतो पण दोघे ही कमावते असल्याने त्याचा फारसा त्रास  जाणवत नाही सध्याची पिढी सुशिक्षित असल्याने आर्थिक नियोजनावर प्रथम लक्ष दिले जाते !

शैक्षणिक बाब लक्षात घेता... मुलांचा घरचा अभ्यास हे देखील काही प्रमाणात ताण तणावाचे कारण ठरत असते ! पण, त्याला देखील ट्‌युशन या पर्याय उपल्बध  असतोच !आणि पालक सुशिक्षित असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही !

कौटुंबिक बाबतीत म्हणायचे झालेच तर सध्या सर्वजण लहान कुटुंबाला प्राधान्य देत असल्याचे सर्वत्र पाहण्यात येते! सणासुदीला किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी सर्वजण एकत्र येत असतात. असे असले तरीही जवळपास सर्वचजण आपण च किती चांगले राहत असतो हे दाखविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे थोडा ताण तणाव निर्माण होतो याची काळजी घ्यायला हवी !

या सर्वांतून स्वतःला ताण तणावापासून दूर ठेवण्यासाठी सुरुवातीला लिहिल्या प्रमाणे "अंतर्गित घटक" आणि "बाह्य घटक यांचा योग्य समतोल साधला की मग सर्वकाही सुरळीत  होते याचा अनुभव मी  स्वतः घेत असल्याने हे इथे अतिशय विश्वासाने सांगू शकते !

धन्यवाद!

सौ. स्नेहा प्रविण जंगम, डोंबिवली

मोबाईल नंबर : 8433511152


 Give Feedback



 जाहिराती