बुलढाणा : बुलढाण्यातुन एका भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झालाय. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
कसा झाला अपघात
प्राथमिक माहितीनुसार,आज (2 एप्रिल) पहाटे साडेपाच वाजता पहाटे साडेपाच वाजता जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे, त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र या अपघाताला जबाबदार कोण याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अन् जखमींना मदत केली. तत्काळ पोलिस आणि आपत्कालीन सेवांना या अपघाताबद्दल माहिती देण्यात आली.
हा अपघात इतका भीषण होता की यात बोलेरो कार चक्काचूर झाली आहे. तसेच इतर दोन वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तर जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.