सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 व्यक्ती विशेष

कुणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही; बीडमध्ये अजित पवारांचा थेट इशारा, रोख कोणावर?

डिजिटल पुणे    02-04-2025 16:55:34

बीड :  उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बीड दौऱ्यावर असून, पालकमंत्री म्हणून हा त्यांचा दुसरा दौरा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या युवा संवाद मेळाव्यात सडेतोड भूमिका मांडली. बीडमधील गुन्हेगारी, जातीयवाद आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी परखड भाष्य केले.अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बीडमधील राखेची आणि वाळूची गँग सरळ करायची आहे. गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाही. कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. सत्ताधारी असो वा विरोधक, कोणाच्याही चुकीच्या वागण्यावर कारवाई होणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.

बेरजेच्या राजकारणावर भरयशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाचा आदर्श घेण्याचे आवाहन करताना, पक्षात नवीन कार्यकर्ते घेताना त्यांचा रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. चुकीच्या व्यक्तींना पाठिशी घालणार नाही आणि महायुतीचा नेता म्हणून बेजबाबदार वागणूक खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

गुन्हेगारीवर कठोर कारवाईबीडमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व गँगवॉर संपवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. चुकीच्या व्यक्तींवर मोक्का लावण्यास मागेपुढे पाहणार नाही.जातीयवादावर बोलताना त्यांनी जातींतील दुरावा संपवण्याचे आवाहन केले. बीड ही देवदेवतांची भूमी असून, येथे शांतता आणि विकासाला प्राधान्य द्यायला हवे, असे ते म्हणाले. बीडच्या बदनामीला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती