सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 व्यक्ती विशेष

वक्फ बोर्डाच्या मोकळ्या जमिनीचा अगोदरच सौदा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले 'पंतप्रधान मोदी जमिनीचा कागद घेऊन .

डिजिटल पुणे    03-04-2025 16:34:42

नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं. मात्र वक्फ सुधारणा विधेयकावरुन मोठं राजकारण रंगलं आहे. उबाठा खासदार संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरुन सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. "वक्फच्या मोकळ्या जमिनीवर सरकारचा डोळा आहे. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक सरकारनं मांडलं," अशी टीका संजय राऊत यांनी केली. "वक्फच्या जमिनींचा सौदा अगोदरचं झाला आहे. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याची घाई करण्यात आली," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी उबाठा पक्षानं महाविकास आघाडीकडून मतदान केलं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "वक्फ बोर्डाच्या देशात 2 लाख कोटीच्या मोकळ्या जमिनी आहेत. या त्यांचा डोळा आहे. त्यामुळे काल गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना आम्ही मोकळ्या जमिनी विकणार असल्याचं सांगितंल. त्यामुळे त्यांचे इरादे स्पष्ट झाले आहेत. वक्फच्या मोकळ्या जमिनीचा अगोदरचं सौदा झाला आहे. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक आणलं," असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी यावेळी केला.

 वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकावरुन उबाठा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदनात उपस्थित नव्हते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारलं असता, "वक्फच्या जमिनीचा अगोदरच सौदा झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी जमिनीचे कागद घेऊन परदेशात गेले असतील," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा पक्षावर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा, "मी डॉक्टर नाही, मात्र अनेकांच्या मानेचे आणि कंबरेचे पट्टे सोडवले, अशी टीका केली. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी "आमच्या मानेचे पट्टे निघाले, मात्र त्यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा आला, त्याचं काय," असा सवाल केला. एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जाऊन झुकतात. त्यामुळे त्यांच्या पाठिला कणा लावण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 


 Give Feedback



 जाहिराती