रत्नागिरी: गेले अनेक दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. कडक उन्हाळा सुरू असतानाच अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे. आयएमडीने महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील कही दिवस राज्यावर हे संकट राहण्याची शक्यता आहे. मात्र या अवकाळी पावसाचा कोकणाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
सिंधुदुर्गात देखील आंबा, काजूच्या बागांना फटका
सिंधुदुर्गात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा व्यापारी चिंतेत आले आहेत. आधीच नेहमीपेक्षा आंबा कमी प्रमाणात असून, त्यात आता अवकाळीचे संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे
हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडी म्हणजे हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासाह पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यावर सध्या उष्णतेची लाट आणि जोरदार पाऊस आणि गारपीट असे तिहेरी संकट पाहायला मिळत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याला अवकळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.