सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 जिल्हा

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

डिजिटल पुणे    03-04-2025 17:27:36

सोलापूर : गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे  मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं आहे. उंचच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी व जीवितहानी झाली होती, हजारांपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे व्हिडिओ देखील मनाला चटका देणारे आहेत. दरम्यान, राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरलली आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. साधारणपणे आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही

याबाबत अधिक माहिती अशी की, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून ५ किमी खाली होते. सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे पुढे आले आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नसल्याचे समोर आले आहे.

तसेच याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. २८ मार्च रोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले होते. तर २ एप्रिल रोजी सिक्किमच्या नामची येथे आणि १ एप्रिलला लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत


 Give Feedback



 जाहिराती