पुणे - मुंबई पोलिस दलातील आयपीएस अधिकारी कै.डॉ. सुधाकर पठारे यांचे आकस्मिक अपघातीलल निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे येथील पोलिस मित्र संघ आणि शांतीदूत परिवारातर्फे शोक सभा घेण्यात आली.


याप्रसंगी माजी आयपीएस अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव, चंद्रशेखर दैठणकर डॉ.चंद्रकांत मंडलिक राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र शांतीदूत परिवार यांनी शोक व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. शांतीदूत अकबर मेंमन, मधू चौधरी आदींनी शोकसभेत कै.सुधाकर पठारे यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली.
