सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 शहर

जोशी, गोडबोले, आठल्ये, माने यांची प्रथमच निवड तर बारवकर, शहा समितीवर पुनश्च

डिजिटल पुणे    05-04-2025 18:34:04

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर गाडीतळ परिसरातील नामांकित गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाणारी आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्थेने व्यवस्थापन समितीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा 28 वर्षानंतरही कायम राखली आहे. आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. हडपसर, पुणे २८ या सहकारी संस्थेची सर्वसाधारण मतदार संधातील सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध जाहीर झाल्याचे प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ चे नियम ३२ ला अनुसरून अविरोध समिति सदस्यांची नावे जाहीर केली.

यामध्ये काहींची नव्याने प्रथमच निवड झालेली असून त्यामध्ये श्री.हेमंत बाळकृष्ण आठल्ये, मीरा श्रीकांत गोडबोले, श्री.विनोद मोहनीराज जोशी, श्री.विवेक चंद्रकांत कंग्राळकर, श्री. सुरेश निवृत्ती अढारी, श्री संपत दादू माने यांचा समावेश आहे तर व्यवस्थापन समितिच्या कार्याचा अनुभव असलेले श्री.अविनाश राधाकिसन लवंगरे, श्री. बाळासाहेब मल्हारी पारखे, श्री. सुहास माणिकचंद शहा, श्री.सोपान विठोबा बारावकर यांचा समावेश आहे. तसेच महिला राखीव संघातून अलका रामनाथ आवारी यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सोसायटीतील सर्व सभासद व कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.

आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. हडपसर या संस्थेची स्थापना 21/12/1996 रोजी झालेली असून प्रारंभापासून निवृत्त अधिकारी श्री.सोपान विठोबा बारावकर आणि  श्री. सुहास माणिकचंद शहा यांनी व्यवस्थापन समितीवर आपले योगदान दिलेले आहे. त्यांचे समितीवरील अस्तित्व विश्वासहार्यता दर्शवते त्यामुळे बहुतांश सभासद सार्वजनिक सेवा प्रती निश्चिंत असतात. काटेकोर नियोजन, उत्तम समन्वय आणि शिस्त, स्वच्छता तसेच पारदर्शक कारभाराची आखणी करुन दिल्याने सोसायटीचे कामकाज व्यवस्थित पार पडले जाते. सोसायटीने अनेक उपक्रम राबविलेले आहेत यामध्ये स्वयंपूर्तीने पारंपरिक ऊर्जा सोलर प्रकल्प (वीज निर्मिती) आणि ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी 'आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था' एकमेव आदर्श सोसायटी आहे. 

सोसायटी म्हटले की वाद-विवाद होतातच मात्र या सोसायटीत सभासदांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, सर्वसाधारण पार्किंग व सदनिकांमधील लिकेज या दोन प्रमुख समस्या उद्धभवतात मात्र आपापसात सामंज्यस्याने समस्यांचे निरकरण केले जाते. निखळ विश्वासहार्य वातावरण आणि समन्वय यामधून दैनंदिन कारभार व बहुतांश उपक्रम राबविले जातात या मुळे सोसायटीने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली आहे. तक्रारी करणे सोपे असते मात्र व्यवस्थापन समितीवर गेल्यावर वास्तव व वस्तुस्थिती निदर्शनास आल्यावर खरी स्थिति समजते त्यामुळे नव्या सभासदांना संधी देण्याचे तंत्र गेल्या अनेक वर्षापासून जुन्या जाणत्या पदाधिकारी यांनी जपले आहे.      

महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (प्रथम सुधारणा) नियम २०१९ याच्या नियम ७६ जी प्रमाणे आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सहकारी संस्थेचा सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या अनुमतीने मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (4) पुणे यांच्या आदेशाने प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांना नियुक्त केले होते. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलेला होता यामध्ये निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचा दिनांक २७.०१.२०२५ होता तर नामनिर्देशान पत्रे वाटप व स्विकृत करण्यासाठी तारीख दि.२८.०१.२०२५ दि. ०१.०२.२०२५ स. १० ते १ तर छाननीसाठी तारीख, वेळ व स्थळ दिनांक ०३.०२.२०१५ संस्था कार्यालय आणि नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची तारीख वेळ दिनांक ०५.०२.२०२५ ते दि.१९.०२.२०१५ या कालावधीत संस्था कार्यालय तर मतदान व मतमोजणी दिनाक ०१.०१.२००५ संस्था कार्यालय असा कार्यक्रम होता मात्र मतदारसंघ निहाय त्या जागांसाठी एका पेक्षा अनेक अर्ज दाखल झाले नसल्याने सर्व प्रवर्ग मधील जागेसाठी मतदान घेण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही त्यामुळे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांनि जाहीर करुन निवडीची नमुना ई ९ नियम ३२ अन्वये यादी प्रसिद्ध केली.

आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. या सहकारी संस्थेची सर्वसाधारण मतदार संधातील सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियमानुसार प्रक्रिया पार पाडली. व्यवस्थापन समितीच्या सर्व साधारण मतदार संघ मधून अनुक्रमे श्री.विनोद मोहनीराज जोशी, श्री.सुहास माणिकचंद शहा, श्री.हेमंत बाळकृष्ण आठल्ये, श्री.अविनाश राधाकिसन लवंगरे, श्री. बाळासाहेब मल्हारी पारखे, श्री.विवेक चंद्रकांत कंग्राळकर यांची तर महिला राखीव मतदार संघ मधून अलका रामनाथ आवारी, मीरा श्रीकांत गोडबोले यांची बिनविरोध निवड झालेली असून अनू. जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या वि. वि. प्रवर्ग या राखीव मतदार संघ मधून अनुक्रमे श्री. सुरेश निवृत्ती आढारी, श्री.सोपान विठोबा बारावकर, श्री संपत दादू माने यांची अविरोध निवड झालेली आहे. 

सोसायटीच्या स्वच्छतेचे महत्व, कार्य व आदर्श उपक्रमांचे कौतुक शासनाच्या सहकार विभाग व पुणे महानगरपालिका तर्फे केले जाते. आगळेवेगळे अभिनव उपक्रम सातत्याने राबविणारी सहकारी संस्था म्हणून नावाजलेली आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. 


 Give Feedback



 जाहिराती