पुणे : आज शांती सदन पुणे येथे प्रसिद्ध युवा अभिनेते रोहन पाटील यांनी (धुमस, मजनू, मुसंडी, खळग, राजा राणी, व संघर्ष योद्धा फेम) शांतीदूत परिवार मार्गदर्शक डॉ. विठ्ठलराव जाधव IPS, Special IGP RTD पुणे व सौ. विद्याताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांची सदिच्छा भेट घेतली, सुनबाई लय भारी व बॅचमेट या सामाजिक विषयावरील आगामी चित्रपटा संदर्भात चर्चा केली.या वेळी शांतीदूत परिवारातर्फे त्यांचा व लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे पाटील यांचा सत्कार,शेतकरी शांतीदूत परिवार अध्यक्ष विजय ठुबे, सुरेश सकपाळ सचिव शांतीदूत परिवार महाराष्ट्र व मधू चौधरी अध्यक्ष शांतीदूत परिवार मॉडेल कॉलनी यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी विठ्ठल झालासे कळस हा चरित्रग्रंथ, शांतीदूत परिवार स्मरणिका व विद्याताई जाधव यांचे चित्रकाव्य पुस्तक भेट देण्यात आले. तसेच महाराष्ट्र शांतीदूत परिवार ब्रँड ॲम्बेसेडर या पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. शांतीदूत परिवाराच्या राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानव व निसर्ग सेवा या उद्दिष्टासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन अभिनेते रोहन पाटील यांनी दिले. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील व सेवा क्षेत्रातील कार्यासाठीच्या भावी वाटचाली साठी शांतीदूत परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा