सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 विश्लेषण

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात प्रवासी महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग;नेमकं काय घडलं?

डिजिटल पुणे    07-04-2025 17:02:33

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील चिकलठाणा एअरपोर्टवर रविवारी रात्री इंडिगो एयरलाइन्सच्या एका फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग करण्यात आलीमुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची रहिवासी होती. तिचे नाव सुशीला देवी होते. ती मुंबईहून विमानात चढली. उड्डाणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली.

मेडिकल इमर्जन्सीमुळे, ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता विमान चिकलठाणा विमानतळावर उतरवण्यात आले. वैद्यकीय पथकाने विमानतळावर त्यांची तपासणी केली, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.अधिकाऱ्याने सांगितले की, एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आणि विमान वाराणसीला रवाना झाले. तर महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापुर येथील सुशीला देवी नावाच्या वृद्ध महिलेने मुंबईहून प्रवास सुरू केला होता. उड्डाणादरम्यान त्यांची तब्येत अचानक खराब झाली, त्यानंतर क्रू सदस्यांनी पायलटला तत्काळ सूचना दिल्या. त्यानंतर विमानाला छत्रपती संभाजी नगरच्या चिकलठाणा एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

लँडिंगनंतर वैद्यकीय पथकाने वृद्ध प्रवाशाला तपासले, परंतु तोपर्यंत या ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी पंचनामा केला. पुढील प्रक्रिया पूर्ण करून विमानाने पुन्हा वाराणसीकडे उड्डाणाचे नियोजन केले. मात्र हे मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. एयरलाइनने या दु:खद घटनेवर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती