सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 शहर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा पुरस्कारामध्ये घोलप महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

डिजिटल पुणे    09-04-2025 14:23:32

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पै. खाशाबा जाधव पुरस्कारामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थ्यांनी पै. खाशाबा जाधव पुरस्कार जाहीर झाला असून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.पुणे, अहिल्या नगर व नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून पै. खाशाबा जाधव पुरस्कार निश्चित करण्यात आला. या अगोदरही २०१९-२० मध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी विराज जाधव यांनी हा सन्मान मिळविला आहे.

मा. कुलगुरू यांनी नियुक्त केलेल्या निवड समितीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी श्री. देवेंद्र सुर्वे तर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष विभाग व महिला विभाग असे दोन्ही पुरस्कार बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले. सौरभ नागरे व भक्ती वाडकर या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील खेळाडूंची सदर पारितोषकासाठी शिफारस केली आहे. 'पै. खाशाबा जाधव सुवर्णपदक' व रोख रक्कम 51 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून १८ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळातर्फे विद्यापीठाच्या प्रांगणातील इरावती कर्वे संकुल सभागृहामध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी सर्वांगीण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. सदर खेळाडूंना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पठारे  यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व विजेत्यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित दादा पवार, उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य व मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती